⚜️गणपती बाप्पा⚜️
गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो खेळायला ?
मी नाही येणार... मी नाही येणार
मला नाही येत पळायला
गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो पोहायला ?
मी नाही येणार ... मी नाही येणार
पोटात लागतं दुखायला
गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो शाळेला ?
मी नाही येणार ... मी नाही येणार
अभ्यास लागतो करायला
गणपती बाप्पा गणपती बाप्पा
येता का हो जेवायला ?
मी येणार... मी येणार
मोदकांचा वास लागलाय सुटायला