⚜️देवांचा whats app group ⚜️
देव सुद्धा कंटाळले
सारखा ऐकून जप
ठरवलं मग त्यांनी
करु सुरू व्हाॅटस अप
मनात करुन विचार,
नारदांनी मारली ब्रम्हदेवांना pin
म्हणाले महाराज,
आपणच व्हा ना group admin
खूप करुन विचार,
दिली ब्रम्हदेवांनी संमती
मग netpack आणि wifi संगे
आली smartphones ना गती
सर्व देवांना add करुन,
रात्री ब्रम्हदेवांनी गाठली शेज
सकाळी आला गणरायाचा,
पहिला good morning चा मेसेज
पण नेमकी नव्हती त्यावेळी
कैलासावर range
तिन्हिसांजेला मिळाला
कैलासपतींना तो gm चा message
क्रोधीत होऊन त्यांनी
पुत्राला केले correct
कोपलेल्या महादेवांनी
नंतर group च केला Left
सरस्वतीदेवींनी पाठवले
ज्ञानाचे message
तर *अप्सरांनी केल्या
beauty tips पेश
धनप्राप्तीसाठी लक्ष्मीनारायणांनी
लिहिले अनुभवाचे बोल
तर गुरुदेव दत्तांनी लिहिले
शांती व वैराग्याचे मोल
सोळासहस्त्र नारींसोबतचे
गोपाळकृष्णांनी केले photo upload
पण प्रभू रामचंद्रांची एकपत्नीव्रताची
कविता ठरली तोडीस तोड
आई अन्नपूर्णेने group वर
टाकल्या छान छान पाककृती
तर धन्वंतरी म्हणाले,
सगळं खा पण जपा आपली प्रकृती
ं
मारुतिरायांनी लिहिला लेख
योगा आणि gym चे फायदे
संतप्त दुर्गादेवी म्हणाल्या
पाळा इथले कायदे,
तरच मिळतील फायदे"
यमराजांनी सुद्धा रेडा सोडून
photo साठी मागितली bike
तर पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईंच्या
photo ला आले प्रचंड likes
Whats App, च्या या खेळात
देव झाले दंग
पण धरतीवरची.सारीच
यंत्रणा झाली की हो भंग
माणसाच्या कर्तृत्वाला
नव्हते देवांचे आशीर्वाद
होऊ लागले त्यांच्यात
तंटे, बखेडे, वितंडवाद
मग मात्र नारदमुनींचे
धाबे दणाणले
ब्रम्हदेवांना ते परत
एकदा शरण गेले
म्हणाले " देवा, group च
सारा करा delete,
सगळ्याच देवांना
याचा आला आहे वीट,
माणसांनाच करू द्या
त्यांचे हे रोजचे काम,
आपण फक्त देवू आशीर्वाद
ऐकूनी आपले नाम !!
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421