⚜️उतारा वाचन भाग ९४⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ९४⚜️

    त्यादिवशी मायाला कापसाची म्हातारी उडताना दिसली. तिला उडताना बघून मायाला  गंमत वाटली. तिने तिला पकडले नाही तर उंच उडून दूर जाऊ दिले. खूप ऊन पडले होते. झाडे, पक्षी उन्हाने हैराण झाले होते. एवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली. म्हातारी मजेत उडत होती. उडता उडता तिला चिमणी दिसली. म्हातारीला पाहून चिमणीला गंमत वाटली.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) मायाला कोण उडताना दिसली ?
२) कापसाची म्हातारी पाहून कोणाला गमंत वाटली ?
३) मायाने कोणाला न पकडता उंच उडू दिले ?
४) उन्हाने कोण हैराण झाले होते ?
५) एवढ्यात कशाची झुळूक आली ?
६) मजेत कोण उडत होती ?
७) कापसाच्या म्हातारीला उडताना कोण दिसले ? 
८) कोणाला पाहून चिमणीला गंमत वाटली ?
९) कापसाची म्हातारी उडत असताना कोणाला दिसली ?
१०) मायाला काय बघून गमंत वाटली ?
११ ) मायाला गमंत वाटली' या वाक्यातील नाम ओळख.
१२) 'उडता उडता तिला चिमणी दिसली' या वाक्यातील सर्वनाम ओळख.
१३) वरील उताऱ्यात किती विशेषनामे आली आहेत ? कोणती ?
१४) 'उंच' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिही.
१५) 'वारा' या शब्दासाठी तुला माहित असलेले समानार्थी शब्द लिही.



⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421