⚜️दृष्टिकोन⚜️
दृष्टिकोन किती महत्वाचा पहा........
गणित तर समजून घ्या ...
"मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.
आपण असे मानू या की....
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
म्हणजेच A=1, B=2, C=3 असे
मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या....
आपण असे म्हणतो की, आयुष्यात कठोर मेहनत/ HARDWORK केले तरच आयुष्य यशस्वी होते.
आपण HARDWORK चे गुण पाहु या.
H+A+R+D+W+O+R+K=8+1+18+4+23+15+18+11=
98% आहेत पण पूर्ण नाहीत.
दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ज्ञान किंवा Knowledge.
याचे मार्क्स पाहु या
K+N+O+W+L+E+D+G+E=11+14+15+23+12+5+4+7+5= 96%
हे पहिल्या पेक्षा कमी.
काही लोक म्हणतात नशिब/ LUCK हेच आवश्यक. तर लकचे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = 47%,
नशिब तर एकदमच काठावर पास.
काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी पैसा/MONEY सर्व श्रेष्ठ वाटतो.
तर आता M+O+N+E+Y=किती मार्क्स ?
M+O+N+E+Y=13+15+14+5+25= 72%,
पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.
बराच मोठा समुदाय असे मानतो की, नेतृत्वगुण / LEADERSHIP करणारा यशस्वी आयुष्य जगतो.
नेतृत्वाचे मार्क्स
LEADERSHIP=12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%,
बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.
मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो? काही कल्पना करू शकता?...... नाही जमत?
मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा "दृष्टिकोन / ATTITUDE
आता एटिट्यूड चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू...
A+T+T+I+T+U+D+E=1+20+20+9+20+21+4+5=100%
आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, 'आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.
"दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल"
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421