⚜️उतारा वाचन भाग ९१ ⚜️
क्रांतिकारकांच्या रक्ताने भारतभूमी लाल होत होती. भारतीय कष्टकरी जनतेतील असंतोष शिगेला पोहचला होता. ब्रिटिश सत्ता हादरली होती. घाबरलेल्या ब्रिटिश सत्तेने भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी म्हणजे फाशीसाठी ठरलेल्या दिवसाच्या आदल्याच दिवशी फाशी दिली. त्यांच्या अंत्ययात्रेपासून प्रेरणा घेऊन हजारो क्रांतिकारक तयार होतील म्हणून सरकार घाबरले.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) भारतभूमी कोणाच्या रक्ताने लाल होत होती ?
२) कोणाचा असंतोष शिगेला पोहचला होता ?
३) कोणती सत्ता हादरली होती ?
४) २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आलेल्या क्रांतिकारकांची नवे लिहा.
५) भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा केंव्हा देण्यात आली ?
६) भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी आदल्या दिवशी का देण्यात आली ?
७) कष्टकरी जनतेत कोणाविरुद्ध असंतोष शिगेला पोहोचला होता?
८) ब्रिटिश सरकार का घाबरले ?
९) उताऱ्यात कोणत्या रंगाचा उल्लेख आला आहे ?
१०) वरील उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा.
११) 'ब्रिटिश सत्ता हादरली होती.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.
१२) 'शिगेला पोहचणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
१३) वरील उताऱ्यात कोणती विरामचिन्हे आली आहेत ?
१४) देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांची नावे लिहा.
१५) भारतीय क्रांतिकारकांची चित्रे जमवा व माहिती लिहा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421