⚜️उतारा वाचन भाग ८९⚜️
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील महान नेत्यांपैकी एक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा मध्यप्रदेश राज्यातील महू या ठिकाणी झाला. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक, कायदेपंडित, अर्थशास्त्री आणि राजनीतीज्ञ होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. त्यांना भारतीय संविधानाचे जनक मानले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६ डिसेंबर १९५६ या दिवशी या जगाचा निरोप घेतला. डॉ. आंबेडकर | यांचे राजगृह हे जगातील सर्वात मोठ्या खासगी ग्रंथालयांपैकी एक आहे. ज्यामध्ये सुमारे ५० हजारांहून ही | अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. मृत्युनंतर त्यांना भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्मदिवस हा भारतात १४ एप्रिल आंबेडकर जयंती म्हणून तर त्यांचा मृत्यू दिवस हा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान भारतीय जनता कायम लक्षात ठेवील.
⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव लिहा.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?
(३) स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते?
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक थोर समाजसुधारक,.. अर्थशास्त्री आणि राजनीतीज्ञ होते.
५) भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केंव्हा झाला?
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथालयाचे नाव काय आहे ?
८) राजगृह या ग्रंथालयात किती पुस्तके उपलब्ध आहेत ?
९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू केव्हा झाला ?
१०) डॉ. आंबेडकर यांना मिळालेला भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
११) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केंव्हा मिळाला?
१२) १४ एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो ?
१३) महापरिनिर्वाण दिन केव्हा साजरा केला जातो?
१४) 'महामानव' असे कोणास संबोधले जाते ?
१५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर बद्दल अधिक माहिती मिळवा व लिहा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421