⚜️उतारा वाचन भाग ८८⚜️

⚜️उतारा वाचन भाग ८८⚜️

   काही दिवसांनी अंबाडी पिकली. त्याची कापणी होऊन अंबाडीचे दोर वळले गेले. त्याच्यापासून जाळी तयार झाली आणि पक्ष्यांना पकडण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. अखेर शेवटी त्या पक्ष्यांना त्या शहाण्या पक्ष्याच्या बहुमोल उपदेशाची किंमत समजली. पण त्या वेळी खूप उशीर झाला होता.

⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) शेतात काय पिकले ?
२) कशाचे दोर वळले गेले ?
३) जाळी कशापासून तयार करण्यात आली ?
४) जाळीचा उपयोग कोणाला पकडण्यासाठी होऊ लागला ?
५) शहाण्या पक्ष्याच्या बहुमोल उपदेशाची किंमत पक्ष्यांना कधी समजली ? 
६) अंबाडी कोठे पिकली ?
७) अंबाडीपासून काय वळले गेले ?
८) अंबाडीच्या दोरापासून काय तयार करण्यात आली ?
९) पक्ष्यांना पकडण्यासाठी कशाचा उपयोग होऊ लागला ?
१०) 'अंबाडी शेतात पिकली. ' या वाक्यातील नाम कोणते ?
११) 'किंमत समजणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिहा.
१२) वरील उताऱ्यात अनुस्वारयुक्त किती शब्द आले आहेत व ते कोणते ?
१३) पण त्या वेळी खूप उशीर झाला होता.' या वाक्यातील सर्वनाम व क्रियापद ओळखून लिहा.
१४) वरील उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा. 
१५) तुम्हाला माहित असलेल्या पालेभाज्यांची नावे लिहा.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421