⚜️पोटी एक मुलगी जरूर असावी...⚜️

⚜️पोटी एक मुलगी जरूर असावी...⚜️

     लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा-बायकोने पक्के ठरवून टाकले की कोणीही दरवाजादरवाजा ठोठावल तरी दार उघडायचे नाही. सर्वात प्रथम "नवरदेवाच्या" आई-बाबांनी दार ठोठावले, पण त्या दोघात ठरल्या प्रमाणे दार बंद राहिले. काही वेळाने "नवरीच्या" आई-बाबांनी दार ठोठावले पण दार बंदच..! पण आत बायकोची घालमेल नव-याला जाणवली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने शेवटी दार उघडले आणि आई-बाबांना भेटलीच. नव-याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
    काही वर्षे गेली. त्यांना २ मुले झाले आणि तिसर्यांदा मुलगी झाली. बापाने सर्वांना बोलावून मोठी पार्टी दिली. पार्टी संपल्यावर बायकोने विचारले, मुलांच्या जन्माच्या वेळी आपण ऐवढी मोठी पार्टी नाही केली. मग मुलीसाठीच का ?
 बापाने हसत हसत उत्तर दिले की, "ते एकच अपत्य असे आहे की, जे आपल्या साठी दार उघडेल......."
very nice.....

  • पोटी एक मुलगी जरूर असावी...थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून, बाबाला घास भरवण्यासाठी... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...रोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी ... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी ... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी ... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी. 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...रडू नको ना बाबा म्हणण्या साठी... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...मुलगी असून आईची माया देण्यासाठी... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...शाळेत सोडायला तूच ये, असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी ... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...उमेदीने तिचा मुद्दा, बाबाला पटवून देण्यासाठी ... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...आई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...बाबाला कन्यादानाचे सुख देण्यासाठी ... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...सासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी... 
  • पोटी एक मुलगी जरूर असावी...पाडवा सणाला, बाबाला भारी साडी मागण्यासाठी...

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421