⚜️उतारा वाचन भाग ९६⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ९६⚜️

      सायली आणि वैभव हे बहीण- भाऊ आहेत. सायली वैभवची ताई आहे. ती त्याचे दप्तर भरून देते. वैभव ला जर कोणी खाऊ दिला तर तो सायली साठी त्यातला अर्धा भाग नक्की ठेवतो. प्रियंका आणि पूजा या बहिणी बहिणी आहेत. त्यांना सारख्याच रंगाच्या रिबिनी बांधायला आवडतात.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) सायलीच्या भावाचे नाव काय आहे ?
२) वैभवची ताई कोण आहे ?
३) वैभवचे दप्तर कोण भरून देते ? 
४) वैभवला कोणी खाऊ दिला तर तो काय करतो
५) वैभव खाऊ कोणासाठी काढून ठेवतो ? 
६) वैभवच्या बहिणीचे नाव काय आहे ?
७) सायली वैभवची कोण आहे ?
८) प्रियंकाची बहिण कोण आहे ?
९) प्रियंका व पुजा एकमेंकीच्या कोण आहेत ?
१०) प्रियंका व पुजा यांना काय बांधायला आवडते ?
११) वरील उताऱ्यात कोणकोणती नाते आले आहे ?
१२) उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिही.
१३) उताऱ्यात किती व्यक्तींची नावे आली आहेत ? कोणती ? 
१४) तुला माहित असलेल्या नात्यांची नावे लिही.
१५) 'माझे कुटूंब' यावर आधारीत माहिती लिही.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421