⚜️बाप⚜️

 ⚜️बाप⚜️

शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप 
तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप

लेतो अंगावरी चिंध्या खातो मिरची भाकर 
काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर 
काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप ?

माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा 
त्याच्या भाळी लिहिलेला रातदिस कामधंदा 
कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडितो लाकडं माय पेटविते चुल्हा 
घामामागल्या पिठाची काय चव सांगू तुला 
आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप

वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.





⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421