⚜️पाऊले चालती पंढरीची वाट ⚜️
पाऊले चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची तोडूनिया गांठ || धृ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...
गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने,
पडता रिकामे भाकरीचे ताट || १ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...
आत्पइष्ट सारे, सगेसोयरे ते,
पाहुनिया सारे फिरविती पाठ || २ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा,
अशा दारिदर्याचा व्हावा नायनाट || ३ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...
मन शांत होता पुन्हा लागे ओढ,
तैसा परी गोड संसाराचा थाट || ४ ||
पाऊले चालती पंढरीची वाट...
वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.