⚜️मन म्हणजे काय⚜️

⚜️मन म्हणजे काय⚜️   


      मन म्हणजे काय हो ?
  • त्याला कोणी पाहिलं नाही, कसं असते ते माहीत नाही, पण त्याला खूप मानसन्मान असतो. 
  • कधी ते लिक्विड असतं,"मन भरलं नाही." असं म्हणतो आपण, कधी ते सॉलिड असतं, मनावर खूप ओझं आहे. 
  • कधी ते घर होतं, मेरे मन में रहने वाली, कधी ते तहानलेल असतं, मेरा मन तेरा प्यासा, कोणी त्याला मोरा ची उपमा देतं, मन मोराचा कसा पिसारा फुलला !!
  • असं हे मन आयुष्य भर, आपल्याला झूलवत ठेवतं, कधी स्वतःच्या मनाने तर, कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे, आपण वागत असतो.
  • हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं? ते कधी प्रेयसीच्या तोंडातून, मंदिर रूप धारण करतं, आणि ती म्हणते..."मन में तुझे बिठाके,.
  • काही जण असतात की, त्याच्या "मनात" काही रहात नाही, तर काही "मन कवडे" असतात.
  • मन दिसत तर नाही. पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.
  • मनात आणलं तर काहीही होऊ शकतं, जरी त्याला कोणी पाहिलेले नाही, तरी ते जर चांगलं असलं, तर आपण आनंदी राहतो.
  • दुसऱ्याचं भलं करतो म्हणुन, म्हंटलं जातं, "मन चंगा तो...
  • कधी हे खूप डेंजर असतं, स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं, आणि "मनातील" राग दुसऱ्याचे नुकसान करतं. 
  • याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून, अस्तित्वात आलेलं नाही, तरी लोकं म्हणतात, "मनाचा ब्रेक,उत्तम ब्रेक. 
  • "मन" दिसत नसलं तरी, तेच आपणाला घेऊन फिरत असतं, कधी घरी, कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात, पण ते निर्मळ असतं, पारदर्शक  असतं. म्हणुनच आपण म्हणू शकतो. "मोरा मन दर्पण कहलाये."
  • अशा या न दिसणाऱ्या, पण सर्वस्व असणाऱ्या, "मनाला" काबूत ठेवण्याचा, अनेकजण प्रयत्न करतात. पण "मनाप्रमाणे" जगता आलं नाही, तर त्याला काही अर्थ आहे का?
  • मग मनसोक्त जगा आणि त्यासाठी... मनापासून शुभेच्छा...!!      

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421