⚜️पंगा⚜️
पानवाला एका शासकीय कर्मचाऱ्यास नेहमी नेहमी टोमणे मारायचा, म्हणायचा, "शासकीय कर्मचाऱ्यास काम कमी आहे आणि पगार जास्त."
एक दिवस शासकीय कर्मचाऱ्याची सटकली.
तो म्हणाला - "एक पान किती रूपयाला आहे ?"
पानवाला म्हणाला, "10 रुपयाचे."
शासकीय कर्मचारी - ठीक आहे. आजपासुन याच पानाचे मी तुला 20 रु. देतो. फक्त काही नियम पाळावे लागतील. हे घे रजिस्टर, यात प्रत्येक पानाची माहिती लिहायची.
उदा :-
- हे पान कोणत्या झाडाचे आहे?
- ते झाड़ कोणत्या शेतात आहे?
- त्याची पाने केंव्हा तोेडली?
- त्याची तारीख, तुझ्या दुकानात आणल्याची तारीख?
- या पानात जे जे टाकले त्या कात, चुना, सुपारी, इ. पदार्थांची माहिती ? मला लेखी स्वरुपात द्यायची.
- त्यावर तुझी सही करायची.
- माझी सही घ्यायची.
- माझ्या साहेबाची सही घ्यायची.
- पान खाण्यापूर्वीचे माझे वर्णन.
- पान खाल्ल्यानंतर ची माझी स्थिती.
- येणार्या प्रत्येक माणसाची लेखी नोंद ठेवायची ,
- प्रत्येक माणसाची मस्टर वर सही घ्यायची.
- नवीन गिर्हाइक आले तर त्याचा फॉर्म भरून घ्यायचा.
- प्रत्येक गिर्हाइकाला मार्गदर्शन व समुपदेशन करायचे,
- वाईट वागला तर शिक्षा करायची.
- रोज आला तर कौतुक करायचं.
- येत नसेल तर प्रबोधन करायचे.
- पानपट्टी बंद केल्यावर गिर्हाइक शोधत फिरायचे.
- सरकारची मोहीम आली की त्याच्या नोंदी करायच्या.
- गावातील लोकसंख्या मोजायची .
- पान खाणारे आणि न खाणारे शोधायचे.
- ही सर्व माहिती लिहायची.
- नंतर ती मी सांगतो त्या software वर entry करायची.
- सदरचा आढावा घेतला असता काही त्रुटी आढळल्यास त्याच्या परिणामाची जबाबदारी तुझी राहील.
इतके सांगेपर्यंत तो पानवाला चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडला होता. शासकीय कर्मचाऱ्यासोबत पंगा घ्यायचा नाही. कारण त्यांना जो पगार मिळतो तो कामाचा व अतिशय ताणतणावाचा आणि सर्वात महत्वाचे वरिष्ठांना सहन करण्याचा असतो......
तात्पर्य:- पगार किती आहे? ह्यापेक्षा कामाचे स्वरूप कसे आहे? कोणत्या परिस्थितीत काय काम करावे लागते? याचा देखील विचार करावा आणि मगच बोलावे.
Dedicate to all Gov Servant.