⚜️गाव तो गावच असतो ⚜️
मुंबईत कितीही करा पैशाची साठवण,
संकटे आली की येते गावाची आठवण.
शाळा सोडली की लगेच निघतो शहरात कामाला,
सण, उत्सव साजरा करायची खरी मजा गावाला.
सकाळी उठलो की ट्रेन, बस साठी धावा,
आपल्या मनावर गावाला शेतावर कधी पण जावा.
गॅस संपला की वेळ येते राहायची उपाशी,
गावाला मात्र चुलीवर भाकरी टाकून खाऊ शकतो
तिखट मिठाशी.
कधी येतात- जातात सण काही समजत नाही,
शिमगा, गणपती सणाला गावाला गेल्याशिवाय राहवत नाही.
असतील सर्व सुख-सोयी शहराकडे भावा,
पण गावच असे ठिकाण आहे जिथे मिळते शुद्ध हवा.
सगळीकडे रस्ते च रस्ते, बघायला नाही मिळत माती,
पहिल्या पावसात जो सुगन्ध दरवळतो तीच गावची माती.
कामावर सुट्टी मारली की, होतो पगार वजा,
भले शेतकरी कमी कमवतो पण तोच खरा राजा.
भाडं, शाळेची फी, इतर खर्च बघून
वर्षभर माणूस नेहमी दुःखात,
उद्या काय होईल माहीत नाही,
पण गावचा माणूस सुखात.
हॉटेल मध्ये जातो चायनीज, बर्गर खायला,
खरी मजा तर तिथे येते जेव्हा बसतो शेतावर जेवायला.
झोप लागत नाही इथे हफ्ते फेडून- फेडून माणूस थकतो,
चार पैसे कमी कमवतो पण सुखाने माणूस झोपतो.
दहा बाय दहा चा खोलीत
पावसात पाणी भरतो,
गावच्या घराच्या पायरीला सुद्धा पाणी लागत नाही
अंगणातच पाणी जिरतो.
कोणतीही वस्तू इथे फुकट मिळत नाही,
पैसे मोजावे लागतात,
चिम्बोर्या, मासे, शेवला, आंबे, करवंदे
ही गावलाच खायला मिळतात.
पैसा कमवतो, रिटायर झाला की गावचा रास्ता धरतो,
ज्या मातीत जन्माला आला, त्याच मातीत जातो.
आता स्मार्ट सिटी ओस पडल्या, 2-3 BHK वाटतो उदास,
मृत्यू समोर आला की गाव येतो कामास.
आपल्याला पाहून आजही आपलेपणा वाटेल गावाला,
आपला माणूस जगेल, म्हणून आनंद वाटेल गावाला.
गाव हा गावच असतो, गाव हा गावच असतो,
मणी, ध्यानी ,स्वप्नी सदैव गावच वसतो...