⚜️गृहिणी म्हणजे गृहिणी असतात..⚜️
⚜️गृहिणी म्हणजे गृहिणी असतात..⚜️
- नसतात इंजिनीअर पण, पिठाच्या गोळ्याचा त्रिकोन करून पोळी मात्र गोल लाटतात..
- नसतात शास्रज्ञ पण, हातात मात्र प्रत्येक व्यंजनाचे मोजमाप अचूक ठेवतात..
- नसतात डाॅक्टर पण, कोणाला काय पचेल याचे भान ठेवतात..
- नसतात शिक्षक पण, संस्कृतीचे धडे मुलांना जाता येता देत असतात..
- नसतात पोलिस पण, मुलांबरोबर नवर्यावरही बारीक लक्ष ठेवून असतात..
- नसतात गायक पण, मुलांसाठी अंगाई हमखास गातात..
- नसतात वादक पण, राग आला की भांडी आपटून तांडव करतात..
- नसतात अर्थतज्ञ पण, नवर्याच्या मोजक्या पगारात काटकसरीने बचतीचा ताळमेळ ठेवतात..
- नसतात पंडीत पण, देवधर्म, पुजाअर्चा, रितीरिवाज, सणवार यांचे औचित्य साधतात..
- नसतात परिचारीका पण, वरिष्ठांची मर्जी सांभाळून प्रेमाने देखभाल करतात..
- नसतात लेखक पण, सर्वांशीच सुसंवादाने प्रेमळ नाते जपत गाथा रचित असतात..
- असतात जिद्दी हट्टी पण, चिऊ,काऊ, माऊ बरोबरच शेजार्यांशीही असते गट्टी..
- असतात सहनशील अन् संयमी पण, एवढ्याशा भांडवलात पण नातेसंबधांचा व्यवहार चोख बजावतात.
- प्रेम आणि आपुलकीच्या जोरावर संसाराचा गाडा हाकत असतात.
संसाराची गुरुकिल्ली कमरेला लावून "राजाच्या घरात राणीचं राज्य" करत असतात..खरचं पुरूषांच्या पेक्षा ग्रेट या नेहमी गृहिणीच असतात....