⚜️कविता 6⚜️

 ⚜️झाड.....⚜️

लावू एक झाड
मुलांनो लावू एक झाड।।

झाडे देती फुले
लाल केशरी पिवळे,
आनंदाने रंगून
जातात सारे मळे.....

झाड देती पाने
अंग हिरवे सगळे,
भाजीपाला,औषधे
पानांतून मिळे.......

झाडे देती फळे
गोड गोड रसाळ,
आंबट,तुरट, गोड
तोंड होई मधाळ......

झाडे आपले मित्र
त्यांना पाणी घालूया,
चला गाणी गाऊन
झाडासंगे नाचुया......

लावू एक झाड
मुलांनो लावू एक झाड

स्वाध्याय

प्र.१)झाडे आपल्याला काय काय देतात?
प्र.२)आनंदाने रंगून कोण जाते?
प्र.३)पानांतून काय मिळते?
प्र.४)फळांची चव कशी?
प्र.५)कोणासंगे नाचायचे आहे?
प्र.६)'झाड'शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
प्र.७)'मित्र'शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
प्र.८)कवितेत कोणत्या रंगांचा उल्लेख आहे?
प्र.९)कवितेत कशाचे वर्णन केले आहे?