⚜️कविता 7⚜️

⚜️पुस्तक⚜️

हातातलं पुस्तक
एकदा रुसलं
दप्तरात जाऊन
लपून बसलं

वाचत नाही कुणी
पाहत नाही चित्र
आता नाही मी
कुणाचाच मित्र

गोष्टी, कविता
माझ्या उदरात
प्राणी, पक्षी
कितीतरी रंगात

जगातलं ज्ञान
मिळतंय छान
मोबाईलला नको
इतका मान

पुस्तकाचं महत्व
किती महान
नको रुसू आम्हावर
आम्ही मुले सान

मी करीन वाचन
मी करीन लेखन
ऐकताच पुस्तक
बाहेर आलं पटकन

स्वाध्याय

१)कोण रुसलं आहे?
२)पुस्तक कुठे लपून बसलं?
३)पुस्तकाच्या उदरात काय आहे?
४)विविध रंगानी कोण सजले आहे?
५)जगातलं ज्ञान कुणामुळे मिळतं?
६)कोणाला जास्त मान द्यायचा नाही?
७)पुस्तक केंव्हा बाहेर आले?
८)'मित्र'शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.