⚜️कविता 8⚜️

 ⚜️रानातली मज्जा⚜️

निळे डोंगर
हिरवी राई
नदी खळखळ
गीत गाई

रानात भरला
डोंगरचा मेवा
काळीमैना,जांभळं
किती खावा

चिंचा अन बोरं
खिशात भरू
शाळेत जाताना
आवडीने खाऊ

नदीतुन मासे
हळूच डोकावती
डराव डराव
बेडूक गाती

झुळझुळ वारा
रानफुले डूले
 दवबिंदूनी होई
 पाय ओले

गोठयात बसली
गाई वासरं
आनंदाने डोले
डोंगराची पाखरं

स्वाध्याय

१)डोंगर कोणत्या रंगाचे आहे?
२)नदी कसे गीत गाते?
३)डोंगरचा मेवा कोणता?
४)'डराव डराव'कोण गाते?
५)नदीतून कोण डोकावते?
६)झुळझुळ वाऱ्यात कोण डोलते?
७)गोठयात कोण बसले?
८)'नदी' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
९)'पाणी'या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.