⚜️कविता 9⚜️

⚜️पाऊस⚜️

आला आला पाऊस
 छान छान धारा,
मातीतल्या बियांना
लागला गार वारा......

दोन पाने वरती
आनंदाने डोलती,
रोपाला पाहून
सोनूली हसती......

इवल्या इवल्या रोपांचे
मोठे झाड झाले,
झाडावरती फुलांचे
सुंदर तुरे जमले.....

गोड गोड फळांनी
झाड कसे भरले,
झाडाला पाहण्या
गोळा होती मुले.....

स्वाध्याय

१)मातीतल्या बियांना काय लागला?
२)आनंदाने कोण डोलते?
३)रोपाला पाहुनी कोण हसते?
४)झाडावरती फुलांचे काय जमले?
५)झाड कशाने भरले?
६)मुले का गोळा होतात?
७)गार वारा कोणाला लागला?
८)कवितेतील 'इवल्या' शब्दाचा अर्थ काय आहे?
९)'मोठे'शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.