⚜️ तुझ्या कुशीत जन्म.....⚜️

⚜️ तुझ्या कुशीत जन्म.....⚜️

तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही तोड 
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड !!धृ!!

किती साठवावे मनी क्षण ते सुखाचे
शिकावे गं शब्द आई तुझिया मुखाचे
किती जरी तू जपशील तळहातावरचा फोड गं ...
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड   !! १ !!

कधी रागामध्ये मजवर टाकशील तू हात गं 
कुठे लागतात पिलांना मांजरीचे दात......
किती जरी तू मजला करशील मारझोड गं....
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड   !! २ !!

एक सांगू का गं आई अनुभव सुखाचा ..
तुझ्या दुधापुढे फिका थेंब अमृताचा..
देव मानवापुढे तुला या जगात नाही जोड गं.......
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड  !! 3 !!

तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही तोड 
आई गं आई तुझी माया पेढ्याहूनी गोड  !!धृ!!


वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.