⚜️आयुष्याच्या डाव⚜️
पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.
- पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात.
- बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.
- पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.
- 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे
- 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.
- या सर्व पत्त्याची बेरीज 364
- एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.
- 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.
- 52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने
- लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.
पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
- दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश
- तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि महेश
- चौकी म्हणजे चार वेद (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेवेद)
- पंजी म्हणजे पंच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान, समान)
- छक्की म्हणजे षड रिपू (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)
- सत्ती- सात सागर
- आठ्ठी - आठ सिद्धी
- नववी- नऊ ग्रह
- दसशी- दहा इंद्रिये
- गुलाम- मनातील वासना
- राणी- माया
- राजा-सर्वांचा शासक
- एक्का- मनुष्याचा विवेक
- समोरचा भिडू - प्रारब्ध
लहानपणा पासून पत्ते बघीतले असतील काहींनी खेळले असतील परंतू त्या पत्त्यांच्या संचा बद्दल माहीती होती का ?
त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.
तात्पर्य:- पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421