⚜️७/१२ शब्दाचा उगम⚜️
साधारणपणे घराचा अथवा जागेचा व्यवहार करताना 'सात बाराचा उतारा' आणावा लागतो. हे बहुश्रुत आहे. 'सात बारा' हे कुठल्याही कायद्याचे कलम नव्हे. ते अहिल्याबाई होळकरांनी दिलेले योगदान आहे. त्यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात १२ फळझाडे लावली. त्यातील सात झाडे त्या गरीबाची आणि पाच झाडे सरकारची. बारा झाडांची निगा राखून, सात झाडांची फळे स्वतःला घ्यायची आणि राहिलेल्या पाच झाडांची फळे सरकारी जमा करावयाची याला ७/१२ असे म्हणू लागले. गरीबांना फळे मिळण्या- साठी एक सरकारी दफ्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली. या नोंदीच्या उताऱ्याला 'सात बाराचा उतारा' म्हणण्याचा प्रघात पडला. तो आजतागायत चालू आहे.
धन्य ती महाराणी.. धन्य तिची दूरदृष्टी ..!!