⚜️शेवटची ओव्हर...जीवनाचा सार..⚜️

⚜️शेवटची ओव्हर...जीवनाचा सार..⚜️

6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता......

   खरं सांगू...ही ओव्हर मला त्या गीतेसारखी वाटली.....जीवनाचा सार सांगणारी.... काय नव्हतं ह्या ओव्हर मध्ये... माणसाचं सगळं जीवन ही ओव्हर अधोरेखित करून गेली...
----------------------------------------
6 चेंडू 16 धावा..
     पहिल्या चेंडूवर हार्दिकची हाराकीरी... आयुष्यात सगळ्याच प्रसंगांना आडव्या बॅटने उत्तर देऊन नाही जमत... हार्दिक इथेच फसला...शिवाय समोरच्याला सहज घेण्याची वृत्ती हार्दिकला नडली....
----------------------------------------
5 चेंडू 16 धावा...
   कार्तिक स्ट्राईकला...एक धाव काढून विराटकडे स्ट्राईक दिली...विराटने आधीच्याच ओव्हरला गियर बदलले होते...आयुष्यात असा मनाचा मोठेपणा दाखवला तर बऱ्याच समस्या सुटतात...एखाद्याला ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे स्ट्राईक द्या ओ.... तो तुम्हालाही विजयी करेल...
----------------------------------------
4 चेंडू 15 धावा...
    तिसऱ्या चेंडूवर विराटच्या दोन धावा... पण त्याचं खरं श्रेय जातं कार्तिकला...किती जिवाच्या आकांताने धावला....खरं सांगू आपल्याला आयुष्यात विजयी व्हायचं असेल तर कार्तिक सारख्या मित्रांची अन नातेवाईकांची गरज ही असतेच...भलेही ती नॉन स्ट्राईकला असोत....
----------------------------------------
3 चेंडू 13 धावा...
     ह्या चेंडूवर विराटचा षटकार... दैव सुद्धा प्रयत्न करण्याला कसं साथ देतं बघा...पायात बॉल टाकण्याच्या नादात चेंडू फुल टॉस पडतो काय... अगदी बॉण्डरीवर सुध्दा तो फिल्डरच्या हाताबाहेर जातो काय अन त्याच चेंडूवर नो बॉल मिळतो काय...
तुमचे कर्म...प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर दैव सुध्दा तुमच्या बाजूने उभं राहतं....फ्री हिट मिळते ओ आयुष्यात सुध्दा...
----------------------------------------
3 चेंडू 6 धावा...
      नवाजचा परत वाईड बॉल...
 ह्याला म्हणतात कठीण परिस्थितीत तोल जाणं.. दबाव हाताळण नाही जमलं गड्याला...मग आपल्याकडूनच अशा चुका होतात...
----------------------------------------
3 चेंडूत 5 धावा...
     गमंत बघा हा...हा चेंडू अतिशय उत्कृष्ट पडला...पण फ्री हिट होती...शिवाय बाईझच्या तीन धावा मिळाल्या...इथं परत विराटचं कर्म उभं राहिलं...आणि संघाचं सुध्दा.…घराचं अस्तित्व उभं राहायला पहिला घरातल्या कर्त्या माणसाचं कर्म उभं राहिलं पाहिजे....खरं तर ह्या फ्री हिटवर विराटने षटकार मारण्याची अपेक्षा होती... कारण फ्री हिटच होती ती... त्यात तो विराट... पण परमेश्वर तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी सहज नसतो ओ देत...पण देतो एवढं मात्र नक्की... त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी...
ह्या चेंडूवर मी परत एकदा कार्तिकला दाद देईन...किती चपळाईने त्याने डाईव्ह मारली...अशी माणसं असावीत आपल्या सोबत...
----------------------------------------
2 चेंडू  2 धावा...
      परत कार्तिकची हाराकीरी... असं जाणवलं की त्याला विजयी चौकार मारायचा होता... अस होतं बरं का बऱ्याच वेळा आपल्याकडून... एखादं यश आता दृष्टीक्षेपात आलंय म्हटलं की आपण आततायीपणा करतो...तोच केला त्यानं...अन त्याची शिक्षा ही मिळतेच..तीच कार्तिकला मिळाली....
----------------------------------------
1 चेंडू 2 धावा...
     प्रेशर हँडल करणं आयुष्यात किती महत्वाचं असतं... हे आपल्याला ह्या चेंडूवरून पाहायला मिळतं...नेमकं तेच जमलं नाही नवाजला...वाईड टाकला गड्यानं...... त्याला वाटलं अश्विन बॅकफूटवर जाऊन खेळेल... इथं दाद द्यायला हवी अश्विनला...कमालीचा प्रेजन्स ऑफ माईंड.... खरं तर बॉलरचा अंदाज बरोबरच होता... पण चेंडू पडताचक्षणी अश्विनने हेरलं होतं की हा वाईड जाणार...आयुष्यात संकटंही अशी वाचता आली पाहिजेत... काही समस्यांच्या आपण नाही मागे मागे जायचं... ती मागून येतात अन निघून जातात...आपण स्थिर राहायचं...अशी ती मागून गेली की आपला एका धावेचा का होईना पण फायदा हा होतोच...तोच अश्विनला झाला....
----------------------------------------
1 चेंडू 1धाव....
    किती हळुवारपणे अश्विनने तो चेंडू मिडऑफच्या खेळाडूच्या डोक्यावरून पुढे ढकलला...जीवनात प्रत्येक संकटाना सामोरं जायला ताकदच लावावी लागते असं नाही ओ..काही समस्या हळुवारपणे पण सुटतात...अन मग बघा तुमचा विजय निश्चित...जल्लोष निश्चित.......
----------------------------------------
    विराटच्या डोळ्यांत...हार्दिकच्या डोळ्यांत आनंदाश्रू....मला ना नेहमीच दुखःश्रुपेक्षा आनंदाश्रू मौल्यवान वाटतात....ज्या गावस्कर, श्रीकांतने ह्या नवीन तरुणांना जिंकायला शिकवलं ते देखील नाचायला लागले... वय महत्वाचं नसतं... गावसकर तर किती लहान मुलासारखं नाचले... आपल्याला आपल्या आयुष्यातील अशा काही प्रसंगाचा कसा आनंद घ्यावा हेच जणू शिकवून गेले....
----------------------------------------
     आणि आता शेवटला महत्वाचं* ....
   तुमच्या पराभवाचे अंदाज वर्तवले जातील... तुम्ही आता संपणार म्हणून तुम्हाला घाबरवलं जाईल.. तुम्ही जिंकूच शकत नाही असं ठामपणे भासवलं जाईल..... तुम्ही हरावं ह्यासाठी जाणीवपूर्वक आजूबाजूला नकारात्मक वातावरण तयार केले जाईल.... तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा... तुम्हाला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंच...
पण खरं सांगू....
हीच वेळ असते स्वतःमधील कोहली जिवंत ठेवण्याची....त्याला स्ट्राईक देण्याची... एका एका रन साठी डाईव्ह मारण्याची.. प्रेझेंस ऑफ माईंड दाखवण्याची...चौकार षटकारासारखं स्वप्नांना उंच उडवून सीमारेषेबाहेर पाठवण्याची...मग..फिर ये कायनाथ तुम्हारे लिये काम करेगी...विजय निश्चित... जल्लोष निश्चित... फक्त ... तो साजराही करायला आला पाहिजे...म्हणून गावस्कर पण तितकेच महत्वाचे... निवृत्त होऊन सुध्दा...
विजयी भव..!!!!

⚜️संकलन⚜️ 

श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421