⚜️घडी मोडणे⚜️
पूर्वी नवी साडी घेतली की बायका सणासुदीला किंवा इतर वेळी कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या. किती प्रेमळ रिवाज होता ना तो. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा. वर्षाला एखाद - दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण मजल असायची. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत. पण तरीही आपली नवीकोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पहाणे सुद्धा किती मोलाचं असतं.
नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची. त्यानिमित्ताने तिच्या अंगाला नवंकोरं कापड लागायचं. तिला खजील वाटू नये म्हणून, "तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात". असंही वरून म्हणायचं..आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा. मनांच्या श्रीमंतीचा काळ होता तो.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421