⚜️पावसामुळ बुट्टी⚜️

 ⚜️पावसामुळ बुट्टी⚜️

पाऊस कमिंग जोरदार पडिंग
ना रूकिंग ना थकिंग बदाबदा पडिंग..।।धृ।।
पत्रा वाजिंग, वारा सुटिंग
पण कपडा नाॅट सुकिंग
वला वला लागिंग ..
ना रूकिंग ना थकिंग जोरदार कमिंग ।।१।।
नदी पण भरिंग ,तळा पण भरिंग
रस्त्यावर पाणी सारखं कमिंग..
जागोजागी खड्डे पडींग
अंगावर चिखल उडींग
ना रूकिंग ना थकिंग जोरदार कमिंग ।।२।।
घरात बसून बोअर होईंग
 टिव्ही बघींग पण लाईंटच गोइंग
आणि लाईट कमिंग तर सिग्नल गोइंग..
ना रूकिंग ना थकिंग जोरदार कमिंग ।।३।।
आत्ताच एकादशी गोइंग 
दिवस भर घरात बसून शेंगा खाइंग
पण पाऊस काही नाॅट थांबिंग
म्हणून मग बायको भजी बनविंग
ना रूकिंग ना थकिंग जोरदार कमिंग ।।४।।
पाऊस कमिंग सगळेच कवि बनिंग
कंटाळून सगळे घरकोंबडा होईंग
पाऊस को मग गर्व वाटींग
तो अजून अजूनच पडींग..
ना रूकिंग ना थकिंग जोरदार कमिंग ।।५।।
पाऊसच पाऊस सगळीकडं पडींग
सगळेच जण नुकसानभरपाई मागींग
आता यात बिचारं सरकार काय करिंग..
नुसत्याच मिटींगा घेऊन घोषणा करींग
आधी वाट बघत होतो पाऊस कधी पडींग
आता वाट पहातोय ऊन कधी पडींग
ना रूकिंग ना थकिंग जोरदार कमिंग ।।६।।
कवी 
नॉट नोईंग