⚜️ज्याची त्यांची मर्जी.....⚜️

⚜️ज्याची त्यांची मर्जी.....⚜️

    थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते. ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता, वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा. हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वेच्या बाहेर." हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसनना दिले व सांगितले की काही काम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसनचे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.
      आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले. त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते, आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञासमोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले "वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरंच तुम्ही फार मोठे आहात! किती दिवस लागले हो हे सगळं करायला?" त्यावर एडिसन म्हणाले "छे हो , हे मी काहीच केलेलं नाही, सगळं आधीच तयार होते. मी फक्त इथे येऊन प्रयोग केले."
    त्यावर प्रोफेसर म्हणाले "माझी चेष्टा करताय काय, असं आपोआप काही तयार होतं होय?" त्यावर एडिसन हसले व म्हणाले "अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली असं म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना, मग हे "ब्रह्मांड" आपोआपच निर्माण झालं हे मला कसं पटेल.
      प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन यानी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात "Where there is a creation, there should be a creator ,Without a creator there is no creation so GOD exists."
जिथे निर्मिती असते तिच्या मागे निर्माता असतोच.
निर्मात्या शिवाय निर्मिती असूच शकत नाही.

तात्पर्य:-  देव अस्तित्वात आहे. मानणे  न मानणे ज्याची त्यांची मर्जी.