⚜️पुर्वजांचा संदेश⚜️
- माणुसकी - घरातील तिजोरी आहे.
- गोड शब्द - घरातील धनदौलत आहे.
- शांतता - घरातील लक्ष्मी आहे.
- आत्मविश्वास - घरातील देवस्थान आहे.
- चारित्र्यसंपन्नता - घराची किर्ती आहे.
- पैसा - घराचा पाहुणा आहे.
- गर्विष्ठपणा - घराचा वैरी आहे.
- अहंकार - घराचा सर्वनाश आहे.
- आतिथ्य - घराचे वैभव आहे.
- नम्रता - घराची प्रतिष्ठा आहे.
- कर्ज - होईल असा खर्च करु नका.
- पाप - होईल अशी कमाई करू नका.
- दुःख - होईल असे बोलु नका.
- चिंता - होईल असे जीवन जगू नका.
- रोग - होईल असे खाऊ नका.
- व्यवस्था - घराची शोभा आहे.
- समाधान - घराचे सुख आहे.
- सदाचार - घराचा सुगंध आहे.
- दुजाभाव विसरणे- घरातील तेजस्वी समई आहे.
- प्रभूचा वास - अशाच घरात नेहमी आहे.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421