⚜️शब्दांचे खेळ⚜️
- थारोळे:- जुन्या काळातील गोष्ट आहे. तेव्हा विहिरीतलं पाणी पाजायला मोटा होत्या. बैलजोडी ती मोट ओढायची. मग पाणी विहिरीतून वर आणलं जायचं. हे पाणी वर आणल्यावर ते साठवण्यासाठी हौद असायचा. त्यात ते पाणी साठवलं जायचं. मग तिथून ते पाटामार्फत जमिनीला पाजलं जात असे. तो हौद किंवा पाणी साठवण्याचं ते डबकं म्हणजे थारोळं. त्यात जसं पाणी साठायचं तसं रक्त जमिनीवर साठून राहिलं, की म्हणतात रक्ताचं थारोळं साठलं.
–------------–-----------------------------------------------------
- खातरजमा :- 'आरोप-प्रत्यारोप होतच असतात पण आपण खातरजमा केल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवू नये,' एक सद्गृहस्थ आपल्या मित्रांना सांगत होते. यातला खातरजमा शब्द म्हणजेच विश्वास. मग पुन्हा विश्वास शब्द वापरायची काय गरज ? तर तो वापरला जातो ते खातरजमा शब्दाचा नीट अर्थ माहीत नसल्यामुळं. हा खातरजमा शब्द आलाय तो फारसी भाषेतून. खातर्जमा हे त्याचं मूळ रूप. अर्थ अर्थातच समाधान, विश्वास, खात्री अथवा संशयाचे निराकरण. यापासून तयार झालेला दुसरा शब्द म्हणजे खातर्तसली. म्हणजे समजूत, समाधान किंवा खात्री.
–------------–-----------------------------------------------------
- पुराणातील वांगी :- कीर्तनकार आणि प्रवचनकार जे दाखले देत असतात ते बहुधा पुराणांतलेच असतात. लोकही ते दाखले ऐकतात. त्यांना ते पटतातही. पण त्यानुसार वागणं काही त्यांना जमत नाही. ते तसं वागत नाहीत. ते म्हणतात, पुराणांतली वांगी पुराणांत. इथं त्याचा काय संबंध ?" आपल्याला वाटेल, 'पुराणकाळात वांग्याला इतकं का महत्त्व होतं ?' तर तसं काहीही नाही. 'वानगी' दाखल याचा अर्थ उदाहरणादाखल. ते कीर्तनकार वानगीदाखल पुराणांतली उदाहरणे देत असतात. ती तर 'पुराणांतली वानगी.' आपण त्याचं करून टाकलं..... पुराणांतली वांगी. वानगीचं झालं वांगी.
–------------–-----------------------------------------------------
- यजमान :- घरची प्रमुख व्यक्ती किंवा स्वामी या अर्थानं आपण यजमान हा शब्द वापरतो. हा शब्द संस्कृतोद्भव. यज या मूळ धातूपासून यज्ञ हा शब्द तयार झाला. यज्ञ करणाराला म्हणू लागले यजमान. यज्ञ, होमहवन या आपल्या परंपरा. शक्यतो असे यज्ञ करतात ते कुटुंबप्रमुखच. अर्थातच, पुरुषसत्ताक पद्धतीमुळं घरचे पुरुषच. त्यामुळंच यजमान या शब्दाला नवरा, धनी हे अर्थ मिळाले. हे यजमान पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करत असत. काळ बदलला तसा या शब्दाच्या अर्थाचाही विस्तार झाला. हल्ली मोठमोठ्या समारंभाचं आयोजन करणारालाही यजमान म्हटलं जातं.
–------------–-----------------------------------------------------
- षोडषोपचार:- षोडशोपचारे हे एक संख्याविशेषण. 'षोडष' हा शब्द तयार झालाय तो संस्कृत भाषेतील 'षट' आणि 'दश' या दोन शब्दांपासून. अर्थातच, 'षोडषोपचार' म्हणजे सोळा प्रकारचे उपचार. अशा प्रकारची पूजा करताना सोळा प्रकारचे उपचार करावे लागतात असा या शब्दाचा अर्थ. योगासना, पाद्यपूजा, अर्घ्य देणे, आचमन, पंचामृत स्नान, वस्त्र अर्पण करणे, गंधाक्षता वाहणे, पुप्षांजली वाहणे, धूप अर्पण करणे, निरांजनाने ओवाळणे, नैवेद्य दाखविणे, तांबूल अर्पण करणे, दक्षिणा देणे, प्रदक्षिणा घालणे, नमस्कार करणे आणि प्रार्थना किंवा आरती करणे हे सोळा उपचार.
–------------–-----------------------------------------------------
- षडयंत्र :- हा शब्द आपल्याकडं आला तो हिंदी भाषेतून. संस्कृत भाषेत यंत्र म्हणजे अडवणे, दमन करणे, साधन, उपकरण; तर हिंदी भाषेत जादूटोणा. जादू ही (बऱ्याचदा) दुसऱ्या माणसाला त्रास देण्यासाठीच केली जाते (असा समज आहे). या जादूत सहा प्रकारचे मंत्र असतात. जारण, मारणं, उच्चाटन, मोहन, स्तंभन आणि विध्वंसन. या सहा प्रकारच्या मंत्रांचा वापर करून एखाद्याचं मोठं नुकसान करता येतं असं मानलं जातं. म्हणून एखाद्या माणसामुळं मोठं नुकसान झालं तर त्यानं आपल्याविरुद्ध षडयंत्र रचलं असं म्हणण्याची प्रथा रूढ झाली.
–------------–-----------------------------------------------------
- निमंत्रण आणि आमंत्रण :- निमंत्रण आणि आमंत्रण हे दोन्ही शब्द मराठी भाषेत वापरले जातात. दोन्ही शब्दांचा अर्थ 'एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात उपस्थित राहण्यासाठी आवाहन करणे' असा आहे. तथापि, दोन्ही शब्दांमध्ये काही सूक्ष्म फरक आहेत. निमंत्रण हा शब्द अधिक औपचारिक आणि शिष्टाचाराचा आहे. हा शब्द सहसा अधिक महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी वापरला जातो, जसे की लग्न, समारंभ किंवा राजकीय कार्यक्रम. निमंत्रण पत्रिका किंवा कार्डद्वारे दिले जाते. आमंत्रण हा शब्द अधिक अनौपचारिक आणि सोपा आहे. हा शब्द सहसा कमी महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी वापरला जातो, जसे की मित्रांच्या किंवा कुटुंबातील मेळाव्यासाठी. आमंत्रण मौखिकपणे किंवा लेखीरित्या दिले जाऊ शकते. पुढील काही उदाहरणे आहेत: 1."मला माझ्या लग्नासाठी तुमचे निमंत्रण मिळाले आहे. मी ते स्वीकारतो." 2."माझ्या घरी उद्या रात्री पार्टी आहे. तुम्ही सर्वांनी आमंत्रित आहात."या उदाहरणांमध्ये, पहिल्या उदाहरणात, लग्न हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, म्हणून "निमंत्रण" हा शब्द वापरला गेला आहे. दुसऱ्या उदाहरणात, पार्टी हा एक कमी महत्त्वाचा कार्यक्रम आहे, म्हणून "आमंत्रण" हा शब्द वापरला गेला आहे. सामान्यतः, खालील मार्गदर्शक तत्त्वे वापरून आपण निमंत्रण आणि आमंत्रण यातील फरक ओळखू शकतो: कार्यक्रमाचा दर्जा: अधिक महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी, "निमंत्रण" हा शब्द वापरा. कमी महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी, "आमंत्रण" हा शब्द वापरा. कार्यक्रमाचा प्रकार: अधिक औपचारिक कार्यक्रमासाठी, "निमंत्रण" हा शब्द वापरा. कमी औपचारिक कार्यक्रमासाठी, "आमंत्रण" हा शब्द वापरा. कार्यक्रमाचे आयोजन करणारे: अधिक शिष्टाचारी व्यक्ती किंवा संस्था कार्यक्रम आयोजित करत असल्यास, "निमंत्रण" हा शब्द वापरा. कमी शिष्टाचारी व्यक्ती किंवा संस्था कार्यक्रम आयोजित करत असल्यास, "आमंत्रण" हा शब्द वापरा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421