⚜️अमूलाग्र की आमूलाग्र ⚜️

⚜️अमूलाग्र की आमूलाग्र ⚜️

    नव्या सरकारनं शिक्षणाच्या धोरणात अमूलाग्र बदल करण्याचं ठरवलं आहे ' हे वाक्य एका शिक्षणाधिकाऱ्यांनी लिहिलं. लेखनातील चूक त्यांना कळलीच नाही. या वाक्यातील अमूलाग्र हा शब्द त्यांनी आमूलाग्र असा लिहायला हवा होता; तरच त्यांचं मत त्यांना हवं तसं पोहचवता आलं असतं. आ, मूल आणि अग्र या तीन शब्दांपासून तयार झालेला शब्द म्हणजे आमूलाग्र. झाडाचं मूळ अर्थात मूल आणि अग्र म्हणजे वरचे टोक. आ म्हणजे पासून .....पर्यंत. 
    आमूलाग्र म्हणजे अर्थातच, मुळापासून शेंड्यापर्यंत. म्हणजेच संपूर्ण. तेव्हा लक्षात ठेवा - अमूलाग्र नव्हे तर आमूलाग्र.