⚜️गडगंज⚜️
लग्नसराईत सर्रास कानांवर पडणारा शब्द म्हणजे 'गडगंज.' 'पाटलांनी सोयरिक मात्र गडगंज इस्टेट बघूनच केली बरं का... अशी वाक्यं ग्रामीण भागात हमखास कानांवर पडतात. शहरी माणसंही हा शब्द वापरतात. हा शब्द मराठी नाही तर फारसी आहे. 'गड' आणि 'गंज' या दोन फारसी शब्दांपासून तयार झालेलं ते फारसीतलं विशेषण आहे. यातलं 'गड' म्हणजे पुष्कळ आणि 'गंज' म्हणजेही पुष्कळच. एकाच अर्थाच्या द्विरुक्ती होऊन तयार झालेला हा शब्द आपण मराठीतही जसाच्या तसा वापरतो. 'त्याच्याकडं गडगंज पैसा आहे' असं सहजच म्हणत असतो.