⚜️३.तोडणी⚜️

⚜️३.तोडणी⚜️

प्रश्न१:- खालील प्रश्न वाचा. उत्तराचा पर्याय गोल करा. 
१. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्याच्या डोळ्यांसमोर काय दिसत होते ?
अ) फक्त ज्वारी
ब) फक्त सोयाबीण
क) फक्त ऊस
ड) फक्त बाजरी

२. तोडणीवाले बैल गाड्या कोठे लावल्या ?
अ) इंग्लिश शाळेजवळ
ब) गावात
क) मराठी शाळेजवळ
ड) गावाच्या बाहेर

३. ऊस तोडण्यासाठी पुढीलपैकी कोणते आवजार वापरतात ?
अ) कुन्हाड
ब) विळा
क) कोयता
ड) खुरपे

४. तारा आणि शंकर परगावी कशासाठी गेले होते ?
अ) ऊसतोडण्यासाठी
ब) घरेबांधण्यासाठी
क) बिगारिकांमासाठी 
ड) घरेबांधण्याच्या कामासाठी

५. ऊसाच्या वरच्या भागाला काय म्हणतात ?
अ) टिपरे
ब) ऊस
क) वाडे
ड) मूळे
६. वसंताच्या मनात कशाविषयी उलघाल होत होती ?
अ) पुस्तकाविषयी
ब) घराविषयी
क) शिक्षणाविषयी
ड) कामाविषयी

७. पुढील शब्दाचा समुहदर्शक शब्द कोणता ?
ऊसाची: ----
अ) पेंडी
ब) भारा
क) बन
ड) मोळी

८. मीराच शिक्षण कितवी पर्यंत झाले होते?
अ) सातवी
ब) पाचवी
क) आठवी
ड) दहावी

९. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढील पैकी कोणती शाळा चालवली जाते ? 
अ) रात्र शाळा 
ब) वस्तीशाळा 
क) प्रौढ शाळा 
ड) साखर शाळा

प्रश्न२:- तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
  1. मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ.
  2. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. 
  3. 'अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.
  4. वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. 
प्रश्न३:- गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. 
  1. श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती.
  2. रात्र, निशा, प्रभात, यामिनी.
  3. अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित.
  4. गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे.
प्रश्न४:- कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून खालील वाक्यांच्या समोर लिहा. 
( आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे.)
  1. वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची-----------------
  2. गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या --------------
  3. सिमरन आईला घरातल्या कामांसाठी --------------
  4. रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा -------------
प्रश्न५:- खालील शब्दांचे अर्थ लिहा. 
  1. तांबडं फुटल.---------------------------------
  2. गाडी रूळावर आली.---------------------------------
  3. चूल शिलगावली.---------------------------------
प्रश्न६:- खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा. 
  1.  'पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय.'
  2. “अवं समदी लेकरं साळंला गेली आन् तुपलं ? "
  3. “आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू?"
  4. 'आता म्या साळंला येणार.'


⚜️निर्मिती⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421