⚜️४. श्रावणमास⚜️
प्रश्न१:- खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.
- १) पहिला पाऊस आल्यावर = --------------------
- २) सरीवर सरी कोसळल्यावर = -------------------
प्रश्न२:- निरीक्षण करा व लिहा.
- श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल
प्रश्न३:-. खालील तक्ता पूर्ण करा. कवितेत आलेली यांची नावे लिहा.
- प्राणी = -------------------------
- पक्षी = -------------------------
- फुले = -------------------------
प्रश्न४:- 'सुंदर बाला या फुलमाला' या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्मा होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.
प्रश्न५:- कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा.
- १. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते.
- २. झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.
- ३. हरिण आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत.
प्रश्न६:- कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.
प्रश्न७:- खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
- आकाश = -----------
- स्त्रिया = -----------
- बासरी = -----------
- मेघ = -----------
- गुराखी = -----------
- पृथ्वी = -----------
- वृक्ष = -----------
- मुख = -----------
- राग = -----------
⚜️निर्मिती⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421