⚜️५. भांड्यांच्या दुनियेत⚜️
प्रश्न१.प्रश्न वाचा. उत्तराचा योग्य पर्याय गोल करा.
१. अरूण व अदिती आजीआजोबांकडे गावी केव्हा आले होते?0000
अ) पावसाळी सुट्टीत
ब) दिवाळी सुट्टीत
क) उन्हाळी सुट्टीत
ड) हिवाळी सुट्टीत
२. आजी मुलांना दुपारी घराबाहेर का जाऊ द्यायची नाही ?0000
अ) थंडीमुळे
ब) पावसामुळे
क) उन्हामुळे
ड) झोपीमुळे
३. अदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली, तेव्हा तिने काय पाहिले ?0000
अ) जाते
ब) भांडी
क) उखळ
ड) काटवट
४. पूर्वी पिठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या लाकडी वस्तूचा वापर करत होते?0000
अ) परात
ब) ताट
क) काटवट
ड) घंगाळ
५. पूर्वी पिठाच्या गिरण्या नव्हत्या तेव्हा धान्य दळण्यासाठी कोणते साधन वापरायचे?0000
अ) उखळ
ब) खलबत्ता
क) पाटा-वरवंटा
ड) जाते
६. कशामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली? 0000
अ) दगडाच्या शोधामुळे
ब) लाकडाच्या वस्तुमुळे
क) धातूंच्या शोधामुळे
ड) मातीच्या भांड्यामुळे
७. पाठात लोखंडी वस्तूंची किती नावे आलेली आहेत ?0000
अ) बारा
ब) आठ
क) नऊ
ड) पस्तीस
८. पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जात नाही ?0000
अ) बादली
ब) कळशी
क) वाटी
ड) घागर
प्रश्न २. समानार्थी शब्द लिहा.
लोखंड = --------------
विकास = --------------
दगड = --------------
मित्र = --------------
भीती = --------------
थंड = --------------
लोक = --------------
खूप = --------------
श्रम = --------------
अंग = --------------
नाव = --------------
नवल = --------------
प्रश्न३. विरुद्धार्थी शब्द लिहा.
खरेदी x --------------
अविभाज्य x --------------
मित्र x --------------
प्रगती x --------------
थंड x --------------
उपयोग x --------------
ग्रामीण x --------------
विकसित x --------------
प्रश्न४.खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
- अ. शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
- आ. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
- इ. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
- ई. आज घरोघरी मिक्सर वापरतात.
प्रश्न५. मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक सांगा.
प्रश्न६. 'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
प्रश्न७. तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते लिहा.
प्रश्न ८. दोन-दोन उदाहरणे लिहा.
- मातीची भांडी :- --------------
- चामड्यापासून बनवलेली भांडी :- --------------
- लाकडी भांडी :- --------------
- तांब्याची भांडी. :- --------------
- चिनी मातीची भांडी :- --------------
- नॉनस्टिकची भांडी :- --------------
- काचेची भांडी :- --------------
प्रश्न ९. यांना काय म्हणतात ?
- अ. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट :- -------
- आ. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे. :- -----
- इ. दुधासाठीचे भांडे. :- --------------
- ई. ताकासाठीचे भांडे. :- --------------
- उ. पूर्वी अंघोळीसाठी वापराचे भांडे. :- --------------
प्रश्न१०. कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा.
(अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगेसोयरे )
- अ. संत तुकारामांनी वृक्षांना --------- संबोधून त्यांचा गौरव केला.
- आ. --------- 'वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.
- इ. आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर ---------
- ई. कुटुंब हे मानवी जीवनाचे --------- आहे.
प्रश्न११. खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा.
(तिथे, दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन)
- कालवाचक क्रियाविशेषण अव्यये :- --------------
- रितीवाचक क्रियाविशेषण अव्यये :- --------------
- स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये :- --------------
- परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये :- --------------
⚜️निर्मिती⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421