⚜️ १.जय जय महाराष्ट्र माझा⚜️

⚜️ १.जय जय महाराष्ट्र माझा⚜️

प्रश्न१:- खालील प्रश्न वाचून उत्तराच्या योग्य पर्यायाला गोल करा.

१.जय जय महाराष्ट्र माझा' या स्फूर्ती गीतातून कवीने कोणाची थोरवी वर्णन केली आहे ?
(१) आईची       
(२) महाराष्ट्राची

२. जय जय महाराष्ट्र माझा या कवितेत कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख आलेले आहे ?
(१) रेवा, वरदा, तापी, कोयना, भद्रा, गोदावरी, गंगा 
( २) रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी, यमुना

३.जय जय महाराष्ट्र माझा या कवितेत कोणत्या राजांचा उल्लेख आलेला आहे ?
(१) छत्रपती शिवाजी महाराज  
(२) राजर्षी शाहू महाराज

४.कवितेची ओळ पूर्ण करा - काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी........
(१) पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
(२) अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा

५.जय जय महाराष्ट्र माझा- ही कविता कोणी लिहली आहे ?
(१)राजा बढे  
(२) राजा लिमये

६. 'जय जय महाराष्ट्र माझा' या कवितेचे कवी कोण ? 
(१) राजा गाडे  
(२) वि दा करंदीकर   
(३) ग दि माडगूळकर    
(४) राजा बढे

७.कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख नाही ? 
(१)कृष्णा    
(२) कोयना    
(३) गोदावरी  
(४) गंगा

८.कशाच्या घागरी कवितेच सांगितलेले आहेत ?
(१) घामाच्या  
(२) तांब्याच्या  
(३) पितळाच्या 
(४) मातीच्या

९. यमुनेचे पाणी कोणाला पाजा असे सांगितले आहे ?
(१)भीमथडीच्या पट्ट्यांना 
(२) भीमानदीच्या पट्ट्यांना 
(३) भीमथडीच्या तट्टांना 
(४) भीमा नदीच्या तत्त्वांना

१०. कवितेत गडगडणारे काय आहेत ? 
(१) मेघ 
(२) ढग 
(३) नभ 
(४) पाऊस

११.अस्मानाच्या सुलतानाला जवाब कोण देत आहे ?
(१) तोंड  
(२) हात 
(३)जिभ 
(४) पाय

१२. सह्याद्रीचा कोण गर्जतो? 
(१) वाघ 
(२) हत्ती 
(३) सिंह 
(४)कोल्हा

१३.दरीदरीतून कोणता नाद गुंजला आहे ? 
(१)जय महाराष्ट्र 
(२)जय जय महाराष्ट्र 
(३)महाराष्ट्र माझा 
(४)महाराष्ट्र आपला

१४. काळ्या छातीवरती काय कोरला आहे ? 
(१) स्वाभिमानाची लेणी    
(२) स्वाभिमानी लेणी 
(३) अभिमानाची लेणी 
(४) आपली लेणी

१५. पोलादी काय आहेत? 
(१)पाय  
(२) हात 
(३) मनगटे 
(४) डोके


⚜️निर्मिती⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421