⚜️आयुष्य⚜️

⚜️आयुष्य⚜️

  • आयुष्य छान रंगवायच असतं, कंटाळवाणं करायचं नसतं आलेल्या प्रसंगाला हसत सामोरं जायचं असतं, हसत खेळत रहायचं असतं  
  • मिळेल ते खायचं असतं, शोभेल असं रहायचं असतं, आणि सर्वांशी प्रेमाने वागायचं असतं .
  • स्वाभिमान जपायचा असतो व्यर्थ कोणास कोणास बोलायचं नसतं, माणुसकी धरून चालायचं असतं .
  • कुळाचे संस्कार विसरायचे नसतात,धर्माला अनुसरून वागायचं असतं, थोरामोठयांचा आशीर्वाद मिळवायचा असतो .
  • माझं माझं म्हणून बोलायचं नसतं, सारं काही आपलंच आहे असे म्हणायचे असतं, समोरच्या व्यक्तीचे मन राखायचे असतं.
  • गरीब श्रीमंत भेदभाव करायचा नसतो, सारयांच्या बरोबरीने उभे राहायचे असते, मी पणाने वागायचे नसते . अभिमान गर्व करायचा नसतो. दुसऱ्याला कमी लेखायचे नसते,गरिबीची चेष्टा करायची नसते, सर्वांना बरोबरीनेच वागवायचे असते.
  • आजची मदत उदयाची ठेव असते, परत फिरून माघारी मिळतं असते, पेरलेले बी उगवत असते, आपल्या वेळेला उभे रहात असते. केलेलं कर्म वाया जात नसते. त्याचे फळ मिळत असते, त्याचा लेखा जोखा टिपत असतो,फक्त लिहीणारा लेखक दिसत नसतो.
  • आयुष्य असेच घडवायचे असते,सार्थकी लावायचे असते आणि आनंदात एक दिवस जगाचा निरोप घ्यायचा असतो. यालाच जीवनाचे मर्म म्हणायचे असते.
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421