⚜️असं का होतं⚜️
- असं का होतं की, ज्या गोष्टीची भीती वाटत असते, नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
- एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो?
- पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी घोकणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो?
- आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्याला कसलातरी आर्थिक फटका बसतोचं बसतो, कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्याच्या नशिबातंच श्रम आणि राबणं असतं का बरं असत ?
- का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं ?
- का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतातं?
- तर ह्या सगळ्यासाठी एकचं कारण आहे, आणि ते कारण आहे आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन.
"तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट, घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीचं आकर्षित केलेली असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…
जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल ना,
अगदी तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनुन तुमच्या जीवनात समोर येते.
उदा.
- माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो तर त्यामुळे कर्ज वाढतं.
- माझं वजन वाढतयं, वजन वाढतयं म्हटलं की वजन अजुनंच वाढतं.
- माझे केस गळतायंत म्हटलं की अजुनंच जास्त केस गळतात.
- माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो.
- कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात. वगैरे वगैरे...
तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी, ठराविकचं स्थळी शांतचित्ताने प्राणायाम करुन चेहर्यावर समाधानाचे भाव ठेवुन मनात ही वाक्ये पुर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा!..
- स्वस्थ आणि आरोग्यपुर्ण जीवन मी जगत आहे. - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.
- मी सुंदर आहे,तेजस्वी आहे, मी चिरतरूण आहे. - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.
- मी धैर्यवान, बलवान,सुज्ञ आणि विवेकी आहे. - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.
- समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन मी जगत आहे. - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.
- माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होतं आहे. - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.
- मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होतं आहे. - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.
- तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षांव होतो आहे. - एक ईश्वरा मी तुझा खुप खुप आभारी आहे.
याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसुचना Auto Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होवुन दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल
तुम्ही हे जर मनापासुन, आणि तशाच संवेदना निर्माण करुन वारंवार बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच _Subconscious Mind_ पर्यंत पोहोचलं, तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सार्या आज्ञा पाळेल आणि खर्याही करुन दाखवेल.
यात अट एकचं असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसुचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्या.इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसुचना बुमरॅग सारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.
म्हणुनचं आपल्या मनात उत्पन्न होणा-या प्रत्येक विचारांविषयी सजग रहा. कधीकधी वर वर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो. त्यामुळे विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते.
उदाहरणार्थ "मी कधीच आजारी पडणार नाही." हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे.त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी "मी आरोग्यपुर्ण जीवन जगत आहे" हे वाक्य अधिक सकारात्मक आहे.
इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणा-या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ उमजेल.अनुभव येईल.
आपणही आपल्या आयुष्यात ही शुभसुरुवात करावी.आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही *शुभेच्छा!!*
आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची खरीखुरी सुरुवात असेल!..
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421