⚜️पुस्तक परिचय - शाळाभेट⚜️

⚜️पुस्तक परिचय - शाळाभेट⚜️

लेखक - श्री. नामदेव माळी 

       आणि येथील शिक्षकांचे यश आहे.आता हे उपक्रम केवळ त्या चौदा शाळेंचे राहिले नाहीत तर महराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते पोहचले.शिक्षणाशी बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांनी त्याचं अनुकरण केले करत आहेत.
           थर्टी फाईव्ह उपक्रमांची साताऱ्यातील शहापूरची शाळा अगदी सहजतेने उपक्रम राबवाचे कसे याचे मार्गदर्शन करते.पारंपारिक शिक्षण पद्धतीला छेद देत वेगळेपण जपणारी शाळा मनात घर करते.आष्टेच्या शाळेतल्या सावित्रीच्या लेकी गटात अभ्यास करताना सरावाला महत्व देतात.शेवटच्या मुलाला समजेपर्यंत सराव कताना मुलच मुलांना शिकवितात. शिक्षकांची फक्त मदत घेतात.शेरेवाडीचा दीडफुट्या बंटी वाचकांना समृद्ध करतो.केवळ गणिती आकडेमोड किंवा वाचन लेखन हे शिक्षणाच अंतिम ध्येय नक्कीच नाही.शेतीचे धडे देणारी शेळकेवाडीची शाळा कृषिप्रधान देशाची पायाभरणी करताना दिसते.कारी गावाच्या माया शिक्षिका मल्लखांब शिकविताना मुलांच्या मनासोबत शरीराला आकार देताना दिसतात.शिक्षक,पदाधिकारी पालक यांनी ठरवल तर शाळेचा किती कायपालट होऊ शकतो याच सुंदर उदाहरण म्हणजे हिरवेपण जपलेली बोरवडेची शाळा.स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी नाथवडे गावची शाळा थक्क करणारी अशीच आहे.स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता यादी पहिली की हि बाब सहज निदर्शनास येते.घंटा नसलेले विद्यामंदिर म्हणजे शिदेवाडीची आदर्श शाळा.इथल्या शिक्षकांच्या  समर्पण वृतीला सलाम.
वरील उताऱ्यात केवळ शाळांच्या नावाचा पुसटसा उल्लेख आढळतो.या शाळांमधील उपक्रम जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचाव लागेल.या शाळा मुलांच्या कृतीला वाव देणाऱ्या आहेत.जिथे आचार आणि विचार एकत्र नांदतात तिथे यशाची खात्री असते.शिकण्याची प्रवृत्ती उपजत आहे शिक्षकाने शिकण्यासाठी मुलांना फक्त मदत करायला हवी.ज्ञान रचनावाद हेच सांगतो.
    लेखक म्हणतात जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तेचा अभाव आहे आणि खाजगी शाळेत गुणवत्ता ओसंडून वाहतेय हे हे चित्र वास्तवाला धरून नक्कीच नाही .हे अवास्तव चित्र आज मोठ्या वेगाने पसरत आहे.या पुस्तकातील शाळा पाहिल्यावर याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही.
       सरकारी शाळांमध्ये मुलांना मुक्तपणा मिळतो.विविध स्तरातील मुले एकत्र शिक्षण घेतात.भरमसाठ फी घेणाऱ्या शाळेत हे घडत नाही.सरकारी शाळा बंद झाल्या तर कष्टकरी गोर गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रवाह खंडीत होईल.म्हणून या शाळा टिकल्या पाहिजेत.नव्हे वाढल्या पाहिजेत.श्रीमंताना या शाळांची गरज नसेलही मात्र खालच्या स्तरातील लोकांना हीच व्यवस्था तारू शकते.
       आज तंत्रज्ञानाच युग आहे हे तंत्रज्ञान शिक्षकांनी अवगत केल आहे नव्हे ते मुलांमध्ये रुजविण्यासाठी शिक्षक धडपडत आहे.शिक्षकांची ही धडपड या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून ओसंडून वाहताना वाचकांना जाणवेल.शाळा आहे आणि शिक्षणही आहे हे वास्तव लेखकाने साहित्यिक मूल्य जपत ओघवत्या भाषेत आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे.पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला दहा वर्ष होऊनही आजही या पुस्तकाचे महत्व कमी झालेले नाही.आजही हे पुस्तक तितकेच महत्वाचे वाटते म्हणूनच हे पुस्तक प्रत्येक शाळेपर्यंत प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहचणे गरजेचे वाटते.