⚜️समयसुचकता⚜️

⚜️समयसुचकता⚜️

   एके दिवशी एक कुत्रा जंगलात रस्ता चुकला. तेवढ्यात त्याला दिसले. एक सिंह त्याच्याकडे येताना. कुत्र्याचा श्वास थांबला. त्याला वाटले. "आज माझं काम तमाम होईल..!"
   त्याने इकडे तिकडे पाहिले तर तिथे काही कोरडी हाडे पडलेली होती, ती हाडे पाहून त्याच्या मनात एक कल्पना आली, आणि तो आला आणि सिंहाकडे पाठ लावून बसला. आणि कोरडे हाड चोखायला लागला आणि जोरात बोलू लागला.
"व्वा! सिंह खाण्याची मजा काही औरच असते. अजून एक मिळाले तर आजची मेजवानी पूर्ण होईल!" आणि त्याने जोरात ढेकर दिला. 
  हे ऐकून यावेळी सिंह विचारात पडला. त्याने विचार केला, "हा कुत्रा सिंहाची शिकार करतो! जीव वाचवून पळून गेलेले बरे!" आणि जीव वाचवून सिंह पळून गेला. पण जवळच्या झाडावर बसलेला एक माकड हा सगळा तमाशा बघत होता.. त्याला वाटले ही एक चांगली संधी आहे, मी सिंहाला संपूर्ण गोष्ट सांगेन. सिंहाशी मैत्री होईल आणि जीवनभर त्याच्या जीवाला धोका पासून दुर होईल. तो लगेच सिंहाच्या मागे धावला. पण कुत्र्याने माकडाला जाताना पाहिलं आणि समजलं की तिथे काही लोचा आहे. दुसरीकडे, माकडाने सिंहाला संपूर्ण कथा सांगितली, कुत्र्याने त्याला कसे मूर्ख बनवले. 
सिंह जोरात गर्जना करत म्हणाला. "माझ्याबरोबर चल, मी आता त्याची लीला खत्म करतो." आणि सिंहाने माकडाला पाठीवर बसवले आणि कुत्र्याच्या दिशेने चालू लागला.
 कुत्र्याने सिंह येताना पाहिल्यावर पुन्हा एकदा त्याच्या समोर जीवाचा धोका निर्माण झाला, पण कुत्र्याने पुन्हा हिंमत दाखवली आणि त्याच्याकडे पाठ फिरवून बसला.आणि जोरात बोलू लागला.
"हे माकड कुठे मेले माहीत नाही, त्याला जाऊन एक तास पुर्ण झाला.पण सिंहला  जाळ्यात अडकून आणू शकला नाही!"
हे ऐकून सिंहाने माकडावर एक वार केला आणि त्याला मारले आणि मागे पळून गेला.
तात्पर्य:अशी अनेक माकडे आपल्या आयुष्यात येतील. त्याना धडा शिकवा. कठीण काळात कधीही आत्मविश्वास गमावू नका.