⚜️समाजभान जपणारं - Pre-Wedding Celebration⚜️

 ⚜️समाजभान जपणारं - Pre-Wedding Celebration⚜️
  ----🙏🙏🙏🙏🙏🙏----

  • कु.आदिती व‌ चि.उमंग यांनी आपलं प्रि-वेडिंग सेलिब्रेशन गोवा, महाबळेश्वर, माथेरान, उटी येथे न करता नित्यानंद वृद्धाश्रमात साजरे करुन दिला तरुणाईला सजग संदेश
  • प्रि-वेडिंग सेलिब्रेशन म्हणजे नवीन दागिने, नवनवीन कपडे, नटणे -थटणे, चमकदार मेकअप, फोटोसेशन असतं. प्रि-वेडिंग म्हणजे एन्जॉय करण्याची वेळ, एकमेकांना जाणून घेण्याची संधी असते; पण कु.आदिती व चि.उमंग म्हणजे महावेडे भावी दाम्पत्य. त्यांनी वयोवृद्ध लोकांच्यात प्रि-वेडिंग साजरे केले.
  • वयोवृद्ध व विकलांग माता भगिनी म्हणजे घरात दुर्लक्षित, नकोसे, अडगळ झालेले लोक असतात. आपलेपणाने विचारणारे कोणी नसतं म्हणून हे लोकं वृद्धाश्रमात असतात. वृद्धाश्रमातील वयोवृद्ध म्हणजे आपलेच आई-वडील असल्याच्या भावनेतून आपले प्रि-वेडिंग त्यांच्यासोबत साजरे केले.
  • दिनांक १३ डिसेंबर, २०२३ रोजी कु.आदिती व चि.उमंग यांनी आपल्या लग्नाचे प्रि-वेडिंग सेलिब्रेशन मीरा रोड येथील नित्यानंद आश्रमात साजरे केले. सर्व वृद्धाश्रमातील वृद्धांना मिठाई व गोडधोड पदार्थांसह सुग्रास भोजन दिले. वृद्धाश्रमात राहणाऱ्या अनाथ मुलांसाठी सुद्धा भोजन दिले.
  • काही वयोवृद्ध माताभगिनींना स्वतः भोजन सुद्धा करता येत नव्हते. कु. आदिती व चि.उमंग यांनी आपल्या हाताने  भरवले व पाणीसुद्धा पाजले. डबडबल्या डोळ्यांनी वृद्धांनी दोघांना आशीर्वाद दिला.
  • आश्रमाचे संचालक यांनी दोघांना आपलं वैवाहिक जीवन सुखी, समाधानी, आनंदी व‌ तंदुरुस्त राहू दे अशा शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.
  • कु.आदिती व‌ चि.उमंग यांनी आपल्या आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षण असल्याचे सांगितले. थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने परमानंद झाल्याची भावना व्यक्त केली.
  • प्रि-वेडिंग सेलिब्रेशन करताना आपला आनंद समाजातील गोरगरीब, गरजू व‌ अनाथांच्या बरोबर शेअर केला तर वैवाहिक जीवनाची सुरुवात नक्कीच चांगली होईल.
  • दिनांक २५ डिसेंबर, २०२३ रोजी कु.आदिती व चि.उमंग यांचे लग्न साधेपणाने साजरे केले. सौ. आदिती व चिरंजीव उमंग यांना  आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना !
           संपत गायकवाड 
(माजी सहायक शिक्षण संचालक)



व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी खालील बटणाला स्पर्श करा.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421