⚜️दानशूर राजा⚜️

⚜️दानशूर राजा⚜️

    एक दानशूर राजा होता. त्यानं एक दिवस जाहिर केलं की, उद्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल. त्यानंतर ज्याला जी वस्तू हवी असेल, त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा.
      दुसरा दिवस उजाडला सर्व लोक राजवाड्यात शिरले, गर्दी जमली. प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले, कुणी पैसे, कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे.
     राजा एका कोपऱ्यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता. अचानक त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं. ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती. राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला. क्षणार्धात राजा तिचा झाला. राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या.
     
तात्पर्य:-  ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो. पण त्या लोकांसारखीच आपली चूक होते, परमेश्वराऐवजी आपण त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो. पण देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल.