⚜️सुखी संसाराची सूत्रे....⚜️
- प्रत्येक स्त्रीचे आणि पुरुषाचे पाहिले कर्तव्य आहे की,आपण आपल्या घराकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष देता येईल त्याची काळजी घेणं.
- आपल्या घरात जर जाणकार वयोवृद्ध कुटुंब प्रमुख असेल आणि घरातील सर्व व्यवहार त्याच्या हाती असेल तर ते जो पर्यंत सक्षम आहेत तो पर्यंत त्यांना करू दयावे त्यात लुडबुड करू नये.
- पतीने आपली कमाई किती आहे याची माहिती पत्नीस देणे.
- पत्नीचे कर्तव्य आहे की जी पतीची कमाई आहे त्याचा ताळमेळ कसा राखावा.
- तुम्ही दिलेल्या पैश्यात जर पत्नी घर नीट सांभाळत असेल तर विनाकारण त्याची चौकशी करू नये.
- घरातील जर मोठया जबाबदार व्यक्ती महत्वाचा विषय बोलत असतील तर तेथे थांबू नये. तेथे मध्ये बोलू नये.
- जो पर्यंत घरात तुमचा सल्ला कोणी मागत नाही तो पर्यंत कोणाला सल्ला देऊ नये.
- आपला पती किव्हा पत्नी कशीही असो दुसऱ्या समोर त्याची टिंगल करू नये.
- जर पती किव्हा पत्नी कडून काही समारंभ चालू असताना चूक झाली तर सर्वांना समोर तिला त्याला अपमानित करू नये.
- संसारात विश्वास हा फार महत्वाचा आहे विनाकारण कोणाचे काही ऐकूण विश्वास कमजोर होऊ देऊ नका.
- पत्नीच्या माहेरच्या किंवा पतीच्या लोकां बद्दल वाईट बोलू नका.
- पती किव्हा पत्नीची काही वाईट सवयी असतील तर त्याला एकटे असताना निदर्शनास आणून द्यावे.
- घरातील महत्वाचा कोणतंही विषय असुदे, तो घरा बाहेर मांडू नका.
- घरात येणारे पाहुणे मंडळी मग ती कोणतीही असुदे त्याची आपली परीने पाहुणचार करा उगाच खोटा मोठेपणा करू नका.
- विनाकारण शेजाऱ्या राहणाऱ्या लोकांशी स्पर्धा करू नका.अंथरून पाहून पाय पसरा.
- घरात काट कसर करून एक ठराविक रक्कम ठेवा जेणे करुन महत्वाच्या वेळी कोणा समोर हात पसरावे लागणार नाही.
- माझ्या माहेरी हे आहे,तिकडे एवढे सुख होते असे पतीस टोमणे मारू नका.कारण नंतर संपूर्ण जीवन तुम्हला इथेच काढायचे आहे.
- आपल्या पत्नीस किंवा पतीस जी गोष्ट पसंत नाही ती शक्यतो सोडून द्या.
- जर पत्नीने आपल्या आई वडिलांची सेवा करावी असे वाटत असेल तर तिच्याही आई वडिलांची सेवा करायची वेळ आली तर जरूर करा तेही तुमचे कर्तव्य आहे.
- आपल्या पती किव्हा पत्नी समोर दुसऱ्या स्त्रीची किंवा पुरुषाची वाहवाह करू नये.
- जर घरात कोणाबरोबर वाद विवाद झाला असल्यास त्याची वाच्यता शेजारी करू नये.
- माझ्या घरात अमुक एक व्यक्ती अशी आहे,तशी आहे,असं इतरत्र बोलू नये त्याची सवय त्यांना माहीत असते.
- घरात कितीही वाद झाले तरी पती घरी आल्यावर लगेच त्याला सांगू नये.
- घरातील कोणत्याच व्यहारात परक्या व्यक्तीस हस्तक्षेप करू देऊ नये.
- घरातील प्रत्येकास त्याचा वयानुसार मान दयावा.
- आपला पती किती कमावतो आपली संपत्ती किती आहे याची माहिती बाहेर देऊ नये.
- आपली पत्नी संपूर्ण घरासाठी राबराब राबत असते तेव्हा तिची प्रशंसा करणे.तिला वेळ मिळेल तेव्हा बाहेर घेऊन जाणे.
- कोणीही घरच्या सदस्यांनी आपणासाठी भेट वस्तू आणली असेल तर ती,जरी आवडली नाही तरी ती स्वीकार त्या मागे त्याचे प्रेम असते.
- पती किंवा पत्नी हे संसाराची दोन चक्र आहेत आणि संपूर्ण घरातील जबाबदारी याच्यावर असते तेव्हा ती नेहमी सारखीच राहिली पाहिजे तेव्हा संसाराचा गाडा नीट सुरळीत चालेल.
- संसार करताना थोडी कुरबुर होणार कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती पण कोणतेही वाद असोत ते विकोपाला जाणार नाही याची काळजी घेणे.
- संसार हा दोन जीवांचा खेळ आहे त्यात नशिबाने कोण कोणास कसा जोडीदार मिळाल सांगता येणार नाही.पण मिळालेल्या जोडीदाराला आपले करणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421