⚜️प्रेरणा⚜️

⚜️प्रेरणा⚜️

    फार पूर्वी एक कारागीर पुतळा बनवण्यासाठी जंगलात दगड शोधायला गेला होता. तेथे त्याला मूर्ती तयार करण्यासाठी एक अतिशय चांगला दगड सापडला.
    दगड घेऊन घरी परत येत असताना वाटेतील एका बाजूला असलेला अजून एक दगड त्याने पाहिला हा दगड नंतर काहीतरी कामाला येईल असा विचार करून त्याने तोही उचलला. घरी आल्यानंतर चांगल्या दगडापासून मूर्ती बनविण्यासाठी हातोडा आणि छिन्नीने त्या दगडावर त्याने आपले काम सुरू केले.
    कारागिराच्या छिन्नीने आणि हातोड्याने दगड दुखावला जाऊ लागला तेव्हा तो दगड वेदनेने कण्हत कारागिराला म्हणाला,अहो भाऊ, माझ्याकडून हे दु:ख / वेदना सहन होणार नाही, त्यामुळे मी विनंती करतो मला सोडा, तुम्ही दुसऱ्या दगड घ्या,
   त्या दगडाचे बोलणे ऐकून कारागिराला दया आली. त्याने तो दगड सोडला आणि जो दुसरा दगड आणला होता त्यावर काम करण्यास सुरवात केली. दुसरा दगड काहीच बोलला नाही. कारागिराने अल्पावधीतच एक सुंदर देवमूर्ती तयार केली.
   तयार मूर्ती घेण्यासाठी जवळच्या गावातील लोक तिथे आले. ते मूर्ती घेऊन निघणारच तोच त्यांची नजर तिथे पडलेल्या दुसऱ्या दगडावर गेली हा दगड नारळ फोडण्यासाठी कामी येईल असा विचार करून त्यांनी तोही दगडही सोबत घेतला. मूर्ती घेऊन त्यांनी वाजत गाजत त्या मूर्तीची मंदिरात स्थापना केली आणि दुसरा दगड ही समोर ठेऊन दिला.
   जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी येत असे, तेव्हा ते मूर्तीवर फुलांच्या माळा अर्पण करत असे, दुधाने स्नान करीत असे आणि त्याची पूजा करत असे. आणि समोरच्या दगडावर नारळ फोडत असतं. आता आधीच्या दगडाला रोज वेदना सहन कराव्या लागत होत्या.
   तो मूर्ती बनलेल्या दगडाला म्हणाला, तूझी तर मजा आहे. दररोज फुलांच्या माळांनी तुला सजवल जातं, रोज पूजा केली जाते. माझं नशीबच खराब आहे. दररोज लोक माझ्यावर नारळ फोडतात आणि मला वेदना सहन कराव्या लागतात.
    हे ऐकून मूर्तीपासून बनवलेला दगड म्हणाला, हे बघ मित्रा, त्या दिवशी कारागिराच्या हातचं दुखणं तुला सहन झालं असतं तर आज तुला हा दिवस बघावा लागला नसता आणि तू माझ्या जागी आला असतास. पण तू थोड्या वेळच्या वेदना सहन करण्याऐवजी सोपा मार्ग निवडला. आता त्याचेच परिणाम तू भोगत आहेस.
तात्पर्य:- आपल्या आयुष्यातही अनेक अडचणी येतात. खूप वेदनाही सहन कराव्या लागतात. पण त्यांच्या भीतीने आपण मागे हटायचे नाही, त्यांच्याशी खंबीरपणे लढायच. ही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अधिक मजबूत नक्कीच बनवेल.