⚜️भारतीय मसाला डबा⚜️

⚜️भारतीय मसाला डबा⚜️

 भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही
  • मिठा सारखे वडील - जेवणात मिठ नसेल तर बेचव जेवण कोणीही खाणार नाही. त्याचप्रमाणे संसारात वडील पाहीजेच ते नसले तर संसाराला चव उरत नाही. म्हणून मिठासारखे वडील हे प्रत्येक संसारात हवेच.
  • हळदी सारखी आई कुठेही जा.. आपली छाप सोडणारी.. रंगात रंगूनी सा-या रंग माझा हळवा... मरावे परी रंगापरी उरावे... अशी हवी हवीशी,आपली आई.
  • जिरे-मोहरी म्हणजे भावंड - कमी-जास्त प्रमाणात तडतडणारंच... चवीने भांडणारे... म्हणूनच याच्या उपास-बिन उपास अशा सोईस्कर वाटण्या करुन दिलेल्या. 
  • काळा मसाला म्हणजे दोन्हीही आजोळ कंपनी - ब-या-वाईट घराणेशाहीच्या गोष्टींच सुवासिक चुर्ण. जातील तिथे आदरयुक्त कौतुकास पात्रच ठरतात. 
  • मेथीचे आणि उडदाचे दाणे - एके काळचे जवळचे आणि आता जरा दुरावलेले खणखणीत नातलग हे अधून-मधूनंच बरे असतात नसता अति परिचयात अवज्ञा ठरलेलीच यांची. 
         आणि 
  • किसून उरलेल्या खोब-याचे तुकडे (काही कुजके पण) -म्हणजे छोट्या गावातले  काका,मामा लोक.. ह्यांच्या घरी यांचा किस पाडला जातो म्हणून हे आपल्या घरात येतात, भाच्यांवर बारीक लक्ष ठेवतात आणि मग खाजगीत पालकांना सल्ले देतात... अण्णा... लक्ष ठेव बरं... पोरं याच वयात हातातून निसटतात. त्या जोश्याच्या पोराचं असंच.
  • त्या कमरेतनंच मोडलेल्या मिरच्या म्हणजे शहरी आत्या आणि मावश्या...मोडतील पण भाच्यांच पुरेपूर दिलोजानसे स्कैनिंग करतील... बेबीताई सांभाळ गं पोरीला...अगं काय तिचं ते नखं वाढवणं, रोज शैम्पु वापरणं, आरश्यात बघणं... उद्या उजवायची आहे तिला.. लोकं लक्ष ठेवून असतात म्हटलं. 
             आणि 
  • सर्वात शेवटी, मित्रमैत्रिणी म्हणजे बडीशेप...एकमेकांना असा काय शेप देतील ना की सारी टेन्शन एकदम खल्लास. हे सर्व लोकं एकेका वयात एकेकटे जिणं हराम करतील, पण एकत्रीतपणे येऊन जीवही तेवढाच लावतील...आयुष्याला चटपटीत,घमघमीतही तेच बनवतील. 
               भारतीय मसाला डबा चिरायु होवो !

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  

📞9421334421