⚜️कुत्रा आणि गाढव ⚜️

⚜️कुत्रा आणि गाढव ⚜️   

     एकदा कुत्र्यात अन गाढवात पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
    ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले, कुत्र्याला वाटले मीच जिंकेन. कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो...!
   पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते. शर्यत सुरु झाली कुत्रा जोरात धाऊ लागला. पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली. 
   असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते 
    तिकडे गाढव शर्यत जिंकून ते राजा झाले होते अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.
तात्पर्य :- आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य  करा, त्याना प्रोत्साहन  द्या... नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील...