⚜️घोडा आणि लांडगा ⚜️
एकदा एक घोडा कुरणात चरत होता. तो इतक मग्न झाला होता की त्याला लांडगा जवळ आल्याचे कळले नाही. ज्या वेळी त्याच्या लक्षात आले तो पर्यंत खुप उशीर झाला होता. घोड्याला एक युक्ति सुचली. तो मैदानावर उड्या मारू लागला. लांडग्याला वाटले "ही संधी चांगली आहे."
लांडगा घोड्या जवळ आला आणि त्याने विचारले, " तु उड्या का मारत आहेस?" घोड्याने उत्तर दिले, "माझ्या पायात काटा मोडला आहे." लांडगा म्हणाला, "मला काटा काढता येतो, मी तुला मदत करतो." लांडगा घोड्याचा मागचा पाय धरू लागला. पण त्याने पाय पकडण्याआधीच तो हवेत उडाला. घोड्याने त्याला एक जोरात लाथ मारली.
तात्पर्य :- प्रसंगावधान जीव वाचवतो.