⚜️युक्ती⚜️

 ⚜️युक्ती⚜️ 

  सूर्य  आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली. जवळच एक वाटसरू बसला होता. त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले. प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट धरू लागला. शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला. मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली. प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली. ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली. 
तात्पर्य :- नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.