देवाकडे पाहण्याचे तीन प्रकार आहेत,



 देवाकडे पाहण्याचे तीन प्रकार आहेत,
एक म्हणजे इच्छा नसताना दुसऱ्याच्या आग्रहास्तव पाहणे,
दुसरा म्हणजे बिगा-यासारखे पाहणे.
आणि तिसरा म्हणजे स्वतः  प्रत्यक्ष बारकाईने पाहणे.अनुभव घेणे.
स्वाती नक्षत्राचे पाणी हे एकसारखेच असते.
ते शिंपल्यात पडल्यास मोती, कपाशीच्या पिकावर पडल्यास पिकाचा नाश व सर्पाच्या मुखात पडल्यास विष होते.
जसा ज्याचा भाव देवाच्या ठिकाणी असेल, तसे त्यास फळ मिळते.
अन्न पाहणे, अन्नाची हकीगत सांगणे अथवा कानाने ऐकणे व प्रत्यक्ष जेवणे, यात फारच अंतर आहे .
तेव्हा जसा ज्याचा भाव असेल, तशी फलप्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात, 
हिरा हा परीक्षकास कळतो ,पण तोच हिरा मूर्खास गारगोटीसारखा भासतो.