⚜️लाकूडतोड्या⚜️
लाकूडतोड्याची करवत खराब झाली म्हणून तू दुकानात गेला व नवी करवत मागितली. दुकानदारांनी त्याला एक आधुनिक करून दिली आणि सांगितले. एका दिवसात दहा झाडे तोडता येतील अशी ही करवत आहे. लाकूडतोड्याने ती आधुनिक करवत घेतली आणि लगेच जायला निघाला. दुकानदारांनी त्याला थांबवले, अरे म्हणे कशी चालवायची ते शिकून घे.
लाकूडतोड्याने सांगितले, 'उभे आयुष्य झाड कापण्यात चालले तुम्ही काय मला सांगणार.' व तो निघून गेला.
एक महिन्याने रागा रागाने परत आला आणि दुकानदाराला सांगू लागला.
'अशी कशी करवत दिली? एका दिवसात दहा झाड तोडणारी म्हणे, एक महिना झाले एक झाडही तोडणं झालं नाही यामुळे.'
दुकानदारांनी विचारलं, 'तुम्ही कशी तोडत होतात.'
तो म्हणाला, 'नेहमीप्रमाणे. करवत खोडावर ठेवून जोरजोराने हलवायचे.'
दुकानदार हसला आणि म्हणाला, 'हे बटन दाबलं होतं का तू.' दुकानदारांनी बटन दाबलं आणि करवत स्वतःहून जोरजोराने हलायला लागली. करवतीत टेक्नॉलॉजी वापरली होती.
तात्पर्य :- आपल्यालाही खूप गोष्टी माहीत असतात पण त्याचा वापर नक्की कसा करायचा हे आपण शिकायला तयार नसतो.