⚜️बॅचमेट...⚜️
एके दिवशी लष्करातील एक कर्नल साहेब विहिरीत पडतात. सैनिक विहिरीत दोर टाकून कर्नल साहेबांना बाहेर काढायचा प्रयत्न करतात . ज्या क्षणी कर्नल वर येई, त्या क्षणी त्या सैनिकांचा सॅल्यूटसाठी दोरी वरील हात सुटे सोडत. कर्नल साहेब पुन्हा विहिरीत पडत .असे अनेक वेळा घडले.
कोणीतरी म्हणाले ब्रिगेडियर साहेबांना मदतीसाठी विनंती करावी कारण त्यांना कर्नलला सॅल्यूट करण्याची गरज नाही. एक ब्रिगेडियर साहेब आले. त्याने दोरी विहिरीत टाकली आणि कर्नल साहेबांनी ती पकडली. ब्रिगेडियर साहेबांनी दोरी ओढायला सुरुवात केली. कर्नल साहेब विहिरीच्या काठावर पोहोचताच त्यांना ब्रिगेडियर साहेब दिसले. त्यांनी लगेच दोर सोडून सॅल्यूट केला. आणि ते पुन्हा विहिरीत पडले . सगळेजण विचारात पडले .
तेवढ्यात खालून हताश कर्नल साहेबांचा आवाज सर्वांना ऐकू आला, "अरे मूर्खांनो ! माझ्या बॅचमेटला बोलवा."
तात्पर्य: वर्गमित्र महत्वाचे आहेत. ते तुमचे प्राण वाचवू शकतात.