⚜️ऐकावे जनाचे करावे मनाचे⚜️
कोण्या एका गावात एक मासे विकणारा राहत होता. आधी तो रस्त्यावर मासे विकायचा, नंतर त्याचे ग्राहक वाढले तेव्हा त्याने विचार केला की, एक दुकान भाड्याने घेऊन तेथे मासे विकावे.
त्याने दुकान सुरू केले आणि वोर्ड लावला येथे ताजे मासे मिळतील. बोर्ड पाहून त्याचे ग्राहक वाढु लागले.
एके दिवशी त्याचा मित्र दुकानावर आला आणि बोर्ड पाहून म्हणाला तु ताजेच मासे विकतोस तर मग बोर्डवर लिहायची काय गरज आहे? मित्राचे ऐकुण त्याने बोर्डावरून ताजे हा शब्द काढून टाकला.
काही दिवसांनंतर एक दुसरा मित्र आला आणि तो म्हणला तु मासे इथेच विकतोस का दुसरीकडे? तो म्हणाला इथेच विकतो. मित्र म्हणला जर इथेच विकतोस तर मग बोर्ड वर इथे का लिहीले आहे? मित्राचे ऐकुण त्याने बोर्डावरून इथे शब्द काढुन टाकला. आता बोर्डवर लिहीले मासे मिळतील.
काही दिवसांनंतर त्याचा तिसरा मित्र आला आणि म्हणला माशाच्या वासानेच कळे की, इथे मासे मिळतात मग लिहायची काय गरज आहे? त्याने बोर्डावरचे मासे शब्द काढुन टाकला.
त्यानंतर हळु-हळु त्याचे ग्राहक कमी होऊ लागले, कारण लोकांना कळतच नव्हते की दुकान कशाची आहे. काही दिवसांतच दुकान चालणे बंद झाले आणि तो व्यक्ती परत रस्त्यावर आला.
तात्पर्य:- काही वेळा लोक न मागताच सल्ला देतात. त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की तो फुकटचा सल्ला ऐकायया का नाही. कोणाच्याही सांगण्यावरून एखादे काम करू नका, यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते.